Skip to main content

जतमध्ये 'स्माईल फौंडेशन' तर्फे जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप

जत/प्रतिनिधी:
जत शहरातील गरीब व गरजू कुटुंबास तसेच स्थानबदध द व निराधार कुटुंबास 'स्माईल फौंडेशन'तर्फे जीवनावश्यक वस्तू ,किराणा माल,भाजीपाला तसेच दररोज ४० जेवण डब्यांचे वाटप केले जाणार आहे.
कोरना कॉविड-१९ ला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या टीमला स्माईल फौंडेशनत तर्फे सरबत, पाणी, नाश्ता व उपवासाचे किटचे वाटप करत आहेत. त्यामुळे फौंडेशनच्या कामाची सर्व स्तरातून व जत मधील नागरिकांतून समाधान व कौतुक होत आहे. 
सध्याची  परिस्थिती पाहता कॉविड-१९ विषाणूचा अतिरेक वाढत चालला असल्यामुळे देशात लॉक डाऊन कालावधी वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण ह्या परिस्थितीत गरीब व गरजू तसेच हातावरचे पोट व स्थानबद्द कुटुंबाची होणारी वाताहत पाहून जत मधील स्माईल फौंडेशन पुढे सरसावली आहे. आता पर्यंत जीवनावश्यक वस्तूचे १०५ कुटुंबास किट वाटप करण्यात आले असून त्यांना एक महिना पुरेल असे धान्याचे वाटप सुरू केलेे असून अजून अनेक कुटुंबास किट देण्याचा उद्देश स्माईल फौंडेशनचे असून व तसेच लोकांना एक हात मदतीचा द्यावा, असे आवाहन सामाजसेवक पवन मोरे व त्यांच्या सहकार्यकडून करण्यात येत आहे. लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर आज आपले कर्तव्य समजत व सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबास धान्याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी पवन श्रीकांत मोरे, करण मोरे, मनोज सूर्यवंशी, दिनेश जाधव, अमित कोळी, प्रवीण सरगर, केंचराव डोंबळे, अर्जुन गुरव, रतन मोरे,पांडुरंग कांबळे, सनी मोरे, अजय भिसे, विशाल चौगुले, हरिदास चौगुले, सचिन मोरे व पत्रकार शशिकांत हेगडे उपस्थित होते.
.                                                                                                                                                                          


For Better Investment plan and Best life cover, please contact to ... Sachin Lahu Zende, Relationships Officer.
Aviva india life insurance ,
Available @ Bank Of maharashtra,Branch :Jath,Dafalapur,Shegaon,Sankh,And Shirdhone.
Please connect me for extra knowledge on...
mo.9158737354/956168257

Comments

Popular posts from this blog

Global pandemic.... Corona Virus जत शहरातील युवकांनी जपलि सामाजिक बांधलकी , जत शहरातील गोरगरीब कुटुंबाला पुरवल्या पालेभाज्या.....

  PSKNEWS .BLOGSPOT प्रतिनिधि माडग्यळ/ सचिन झेंडे  जत शहरातील युवकांनी  बांधलकी जपत  गोरगरीब कुटुंबा ला जिवनावष्यक वस्तु देत समाजाप्रति आपली असलेली आपुलकि चे दर्शन घडविले, दिवसें दिवस कोरोना विषाणु जास्तच पसरत असतनाचे दृश्य दिसत आहे, आणि याच्या पासून सुटका व्हायची असेल तर लॉक डाउण काळात शासनाने दिलेल्या सुचनाचें पालन करने गरजेचे आहे , आणि सर्व जन लोक ह्या सुचनांचे पालन ही करत आहेत, पण या लॉक डाउण परीस्थितत , गरीब लोक ,हातावरचे पोट असणारे कुटुंबा ची होणारी वाताहत पाहून जत शहरातील सामाजिक बांधिलकी जपणारी अशीच  मित्र संघटना आहे, सर्व  मित्रांच्या आर्थिक मदतीने आणि उपस्थित सर्वांच्या सहकार्या ने जत शहरातील या समाजसेवक  युवकांनी  सामाजिक बांधलकीे म्हणून गरजूंना आज पालेभाज्यांचे वाटप केले ,यावेळी प्रशांत झेंडे,आकाश बनसोडे , अशोक कोळी ,सनी गडीकर, सुभाष कांबळे, अक्षय बनसोडे,दिपक कांबळे, कुमार उपस्थित राहुन या कार्यास हातभार लावला , यावेळी प्रत्येक चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. .       ...

जतमध्ये बजाज फायनान्स कडून ग्राहकांची दिशाभूल - पवन मोरे

....................................................................................................... जतमध्ये बजाज फायनान्स कडून ग्राहकांची दिशाभूल - पवन मोरे  जत/प्रतिनिधी: कोरोनामुळे आर बी आय ने कर्जदाराची वसुली थांबवली आहे या शिवाय ग्राहकांना संकटसमयी सहकार्य करून मदत करण्याचे काम आर बी आयने केले आहे असे असताना बजाज फायनान्स कंपनी कडुन सर्व सामान्य ग्राहकांची ( इएमआई ) मोबाईल, वयक्तिक कर्ज, गाड्यांचे हफ्ते तसेच घरगुती सामान हाफत्यावर कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांना करोनाचे जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आर बी आय ने धीर दिला असताना नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे आगाऊ २४ ते २५ टक्के व्याजदाराची भीती दाखवून ग्राहकांचे चेक बाऊन्स करून हफ्ते वसुलीसाठी ग्राहकांना फोन करून नाहक त्रास बजाज फायनान्स करत आहे असे बेकायदेशीर पणे ज्या ग्राहकांची फसवणूक होत आहे आशा ग्राहकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद द्यावी तसेच बजाज फायनान्स च्या कोणत्याही लिंकवर जाऊन विनवणी अर्ज करण्याची गरज नाही त्यामुळे चेक बाऊन्सला न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद नोंद करावी ज्यावे...

कामगार सेना लायन्स क्लब कडून हॉस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवभोजन थाली वाटप....

GLOBAL PANDEMIC..... CORONA VIRUS जत : सध्या देशात व राज्यात कोरोनाचा लोकांना अतिभयंकर संकटाचा सामना करावा लागत असून संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. याच पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गोरगरिबांना काही संस्था हातभार लावण्यात पुढे सरसावले आहेत. त्यात कामगार सेना जत तालुका व लायन्स क्लबच्या वतीने संचारबंदी काळात अनेक उपक्रम घेण्यात येत आहेत. कामगार सेना व लायन्स क्लब कडून जत मधील माऊली हॉस्पिटल चे डाॅ. नितीन पतंगे, जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ. शरद पवार,उमा हाॅस्पिटल चे डॉ. रविंद्र आरळी ,कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी,माजी तालुका शिवसेना प्रमुख मलकारी पवार यांच्या हस्ते या हाॅस्पिटल मधील गोरगरीब गरजू पेशंट व लोकांना शिवथाळी पार्सल वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रिय योजना शिवभोजन योजना राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व तालुकास्तरावर यांची व्याप्ती वाढवण्यात आली असून ती कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाच रूपयात ही थाळी मिळत आहे. शिवभोजन थाळी हि जत तालुक्यात एस टी कॅन्टीन मध्ये सुरू करण्यात आली अ...