Skip to main content

Posts

Showing posts with the label Social worker

सलीमा मुल्ला यांच्याकडून पांडोझरी येथे जीवनावश्यक किटचे वाटप

संख प्रतिनिधी  मिलींद टोणे  पांडोजरी (ता. जत) येथील काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सलीमा मुल्ला यांच्या कडून पांडोझरी येथील आदिवासी पारधी तांडा येथे गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले किट वाटप करण्यात आले .        कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने गोरगरीब आणि कामगार यांच्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व कामे बंद असल्याने मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातील लागणारे अन्नधान्य संपत आले आहे.  माणुसकी दाखवत सलीमा मुल्ला यांनी अन्न धान्यचे वाटप केले आहे. यावेळी लोकांच्या गैरसोयीचा विचार करुन पांडोझरी येथील आदिवासी पारधी तांडा येथे जीवनावश्यक वस्तुंचे कीट सलीमा मुल्ला, व श्री .के .डी. मुल्ला यांच्या हस्ते गोरगरीब लोकांना  किट वाटप करण्यात आले.          काँग्रेस कमिटी जत तालुका अध्यक्षा सलीमा मुल्ला ह्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. अनेक वेळा लोकांच्या मदतीला धाऊन जातात. दुष्काळ, महापू...